Sanjay Raut । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या दोन्ही नेत्यांवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत यांनीही आता सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो. आपण कालपर्यंत कोणाविरुद्ध लढत होतो याचा भान सुरेश धस यांनी ठेवायला पाहिजे होते. त्यांच्यात एक डील झाली आणि त्यानंतर धसांनी माघार घेतली. ते माघार घेणार असल्याचे मला एका व्यक्तीने सांगितले होते,” असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“सुरेश धस डिल झाल्याशिवाय ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले गेले ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद, पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला,” असा देखील आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे राऊत म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) त्यांचे बॉस आहेत, असे सुरेश धस म्हणतात. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाल्याने मी इथून बाहेर पडलो. त्यांची हिंमत आहे का सांगायची?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut on Suresh Dhas
दरम्यान, संजय राऊत यांनी धस यांच्यावर आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप केला आहे. त्यामुळे धस यांची संतोष देशमुख (Santosh Deshmukh) प्रकरणात त्यांनी बजावलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या आरोपांना धस कसं उत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :