Share

Mahadev Munde यांची हत्या कशासाठी झाली? स्थानिक गुन्हा शाखा ॲक्शन मोडमध्ये

It is seen that the local crime branch has started the witness examination of the Mahadev Munde murder case.

by MHD

Published On: 

Local crime branch in action mode in Mahadev Munde murder case

🕒 1 min read

Mahadev Munde । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणाचा वेगाने तपास सुरु आहे. अशातच आता परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणाची (Mahadev Munde murder case) उशिरा का होईना सुरुवात झाली आहे. यामुळे या हत्याप्रकरणाचा लवकरच खुलासा होणार असल्याचे बोलले जात आहे.

15 महिने उलटून गेल्यानंतरही महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी फरार असल्याने मुंडे कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात या प्रकरणासाठी 5 सदस्यांच्या एका पथकाची नियुक्ती केली आहे.

अशातच आता स्थानिक गुन्हा शाखेकडून महादेव मुंडे खून प्रकरणाच्या साक्षीदार तपासणीच्या कामाला सुरुवात झाली असून या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे (Santosh Sable) हे परळीमध्ये दाखल झाले आहेत. आता या प्रकरणातून काय समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरते.

महादेव मुंडे खून प्रकरणाचा एलसीबीचे पी आय म्हणून काम केलेले संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल आता तपास करणार आहेत. याबाबत मागील आठवड्यातच पोलीस अधीक्षक नवनीत काँवत (Navneet Kanwat) यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली होती.

Supriya Sule meet Mahadev Munde family

दरम्यान, कालच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, सुप्रिया सुळे यांनी नवनीत काँवत यांच्याकडे लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्याची आणि तपासात काय प्रगती झाली याची माहिती मुंडे कुटुंबांना वेळोवेळी द्यावी, अशी मागणी केली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)