पुणे जिल्हा बँकेतून भाजप उमेदवारांसाठी फोन; ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फोन केले जात असल्याचा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे यांनी चौकशीची मागणी केली आहे.

Published On: 

Supriya Sule

पुणे, 22 ऑक्टोबर: पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचाराची मुदत संपली आहे. अशातच खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ऑडिओ क्लिप शेअर करत खळबळजनक दावा केला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करणारे फोन केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रकरणी निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी तातडीच्या चौकशीची मागणी केली आहे.

या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “सहकारी संस्था या सर्व सभासदांच्या हितासाठी कार्यरत असतात. त्यांचा आणि तेथील कर्मचाऱ्यांचा राजकीय प्रचारासाठी वापर करणे अयोग्य आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा असा वापर होत असेल तर ते सहकाराच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासणारे असून, हा प्रकार अतिशय गंभीर व आक्षेपार्ह असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि दबावमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी नम्र विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघांसह नागपूर पदवीधर, औरंगाबाद (मराठवाडा) पदवीधर आणि अमरावती शिक्षक या मतदारसंघांच्या निवडणुकीचा प्रचार आता थंडावला आहे. महायुतीमध्ये भाजपने तीन जागांवर उमेदवार दिले असून, ते पुणे पदवीधर, पुणे शिक्षक आणि नागपूर पदवीधरमधून निवडणूक लढवत आहेत. तर, मराठवाडा पदवीधरची जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आली असून, शिवसेनेला अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा मिळाली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात पुणे शिक्षकमधून काँग्रेसचे जयंत आसगावकर, पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हर्षदा देशमुख जाधव आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनील मोदी हे निवडणूक लढवत आहेत. या जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून, मतदारांना उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवायचा आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करणारे फोन केले जात असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही