Manoj Jarange Patil । अभिनेता राहुल सोलापूरकरांचा (Rahul Solapurkar) छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेला एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य असलेला व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर सोलापूरकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत माफी मागितली. परंतु, सोलापूरकरांवर कारवाई करावी, अशी राज्यभरातून मागणी केली जात असताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी सोलापूरकरांच्या वक्तव्यामध्ये काहीच आक्षेपार्ह नसल्याचे सांगितले. यावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“पुणे पोलीस आयुक्तांनी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जवळचा त्यांच्या टोळीतला माणूस आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणारच नाही,” असा दावा जरांगे पाटील यांनी केला.
“देवेंद्र फडणवीसांनी एक टोळी बनवलेली आहे .या टोळीत वकील आहेत. मोघम अभ्यासक आहेत, जे साहित्यिक म्हणून नाव लावतात. सरकारच्या आशीर्वादाने राहुल सोलापूरकरवर कारवाई झालेली नाही. हे तिरस्काराने भरलेले सरकार आहे,” असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis
दरम्यान, राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. गंभीर आरोपांवर देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :