IPL Trophy । बीसीसीआयने (BCCI) 16 फेब्रुवारीला आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक (IPL schedule 2025) जाहीर केले आहे. या हंगामातील सलामीचा सामना हा 22 मार्चला खेळवला जाणार आहे. गेल्यावर्षी केकेआरने (KKR) ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते.
पण यंदा कोणता संघ ही ट्रॉफी जिंकतेय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तुम्ही आयपीएलच्या ट्रॉफीकडे बारकाईने पाहिले तर तुम्हाला ट्रॉफीवर संस्कृतमध्ये एक श्लोक लिहिलेला दिसेल. अनेकांना या श्लोकाचा अर्थ माहिती नाही. (IPL 2025 Trophy)
महत्त्वाचे म्हणजे ट्रॉफीवर संस्कृतमध्ये लिहिलेले शब्द स्पर्धेशी निगडित आहेत. ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिहि’, असं संस्कृतमध्ये ट्रॉफीवर लिहिलेले असते. याचा अर्थ, प्रतिभा आणि संधी एकत्र ठिकाणी असा होतो. हा श्लोक आयपीएलचे बोधवाक्य आहे.
या श्लोकाच्या अर्थाप्रमाणे, आयपीएलने (IPL) टीम इंडियाला अनेक प्रतिभावान खेळाडू दिले आहेत. विशेष म्हणजे IPL सुरू झाल्यानंतर काही वर्षांनी ट्रॉफीचे स्वरुप बदलले आहेत. IPL चे टायटल स्पॉन्सरर (Title sponsor of IPL) देखील अधूनमधून बदलले आहेत. IPLचा सध्याचा टायटल स्पॉन्सरर टाटा समूह आहे.
IPL 2025 Match Where To Watch On TV?
आयपीएलच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
IPL 2025 Match Live Streaming Details
आयपीएलचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत. परंतु, Viacom18 आणि Star India यांचे विलीनीकरण झाले असल्याने जिओचे जियो हॉटस्टार (Jio Hotstar) हे नवीन अॅप आले आहे. पण येथे चाहत्यांना IPL सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार नाही. जर चाहत्यांना सामने पाहायचे असतील तर पैसे खर्च करावे लागतील.
जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल तर सबस्क्रिप्शन पॅकची सुरूवात 149 रूपयांपासून सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ऍड फ्री व्हर्जनसाठी तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी 499 रुपये प्रेक्षकांना मोजावे लागू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या :