🕒 1 min read
Laxman Hake । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही. यामुळे पोलिस यंत्रणेवर दबाव वाढला आहे.
अशातच आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी बीडमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मी तुमच्यासाठी लढेन. तुम्हाला, तुमच्या मुलाला आणि नातवंडांना न्याय मिळवून देईन, असा शब्द देशमुख कुटुंबियांना दिला. यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुळेंवर निशाणा साधला आहे.
“शरद पवार (Sharad Pawar) यांना मी कायम बेगडी पुरोगामी नेता म्हणत आलो आहे. सुप्रिया सुळे त्याचा शिक्का आपल्या वर्तनातून दाखवून देत असतात. सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघातील उतरवली गावात विक्रम दादासाहेब गायकवाड या तरुणाची हत्या झाली. ती त्यांना दिसत नाही,” असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
Laxman Hake on Sharad Pawar
पुढे ते म्हणाले की, “बेगडा शरद पवारांची बेगडी लेक इतर जातीमधील त्यांना हत्या दिसत नाहीत. सुप्रिया सुळे बेगडी पुरोगामी नेतृत्व असून सुप्रिया सुळे या दुःखद प्रसंगावर राजकारण करत आहेत,” असा दावा देखील लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
Laxman Hake on Walmik Karad and Manoj Jarange Patil
“ज्याप्रकारे वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट झाली होती. त्याच अर्थाने ही भेट झाली असावी. दोन भेटींकडे वेगळ्या भावनेने बघत नाही. मनोज जरांगेंनी वाल्मिक कराडची पहाटे का भेट घेतली? मनोज जरांगेंची स्पेस संपली नाही. जरांगे असतानाच शून्य माणूस होता,” असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :
- Punjab Kings ला आयपीएलपूर्वीच मोठा झटका, करोडोंची बोली लावलेला खेळाडू दुखापतग्रस्त
- Dhananjay Munde लवकरच देणार राजीनामा? पडद्यामागं हालचालींना वेग
- Ranveer Allahbadia ला सुप्रिम कोर्टाचा धक्का, घेतला ‘हा’ मोठा निर्णय