Ranveer Allahbadia । युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया इंडियाज गॉट लेटेंट (India’s Got Latent) या शोमध्ये अश्लील टिप्पणी केल्याप्रकरणी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल केले आहेत.
याविरोधात त्याने सुप्रिम कोर्टाचा (Supreme Court) दरवाजा ठोठावला होता. परंतु, कोर्टानेच त्याला मोठा झटका दिला आहे. “रणवीरच्या मनात काहीतरी खूप घाणेरडं होतं, ते त्याने त्या शोमध्ये ओकलं. अशा वर्तनाचा निषेध करायला पाहिजे. तुम्ही लोकप्रिय असल्याने तुम्हाला समाजाला गृहीत धरता येणार नाही. अशा व्यक्तींना आम्ही का संरक्षण दिले पाहिजे?” असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे.
तसेच सुप्रिम कोर्टाने रणवीर अलाहबादियाला त्याचा पासपोर्ट (Passport) पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आणि पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय देश सोडून न जाण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे रणवीर अलाहबादियाच्या अडचणीत भर पडली आहे. (Ranveer Allahbadia Controversial Remarks)
रणवीर अलाहबादियाला आपल्या प्रसिद्धीचा गैरवापर करून, समाजाच्या भावनांशी खेळायला अधिकार नाही. अशा प्रकारच्या अपमानजनक टिपण्णीमुळे तो आणि त्याचे इतर सहकारी इंडियाज गॉट लेटेंट शोला पुढे चालवू शकणार नाहीत, असाही निर्णय कोर्टाने दिला आहे.
Ranveer Allahbadia Controversial Remarks on India’s Got Talent
दरम्यान, रणवीर अलाहबादियाने सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली होती. “माझी टिप्पणी योग्य नव्हती आणि ती हास्यास्पद होती. कॉमेडी माझी विशेषता नाही, आणि मी कुणाचं अपमान करण्याचा हेतू ठेवला नव्हता,” असे त्याने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :