Santosh Deshmukh । मागील काही दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामुळे (Santosh Deshmukh murder case) राज्याचे वातावरण बदलले आहे. आज खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन केले.
परंतु, मस्साजोगच्या नागरिकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अपहरण झाल्यानंतर मस्साजोगचे गावकरी पोलीस स्टेशनबाहेर उभे होते. पण या पोलिसांनी सहा वाजेपर्यंत आमची तक्रारच घेतली नाही. बीडमधील स्थानिक पोलिसांनी 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर या काळात तपासात घोळ केला, असा आरोप गावकऱ्यांनी केला.
संतोष देशमुख यांच्या मृतदेहाबाबत माहिती मिळाली त्यावेळी सगळे गावकरी तिकडे गेले. पोलिसांना संतोष देशमुख यांना कोठे नेण्यात आले? तिथपासून त्यांचा मृतदेह केजमध्ये आणून टाकेपर्यंत सगळे काही माहिती होते,” असा आरोप गावकऱ्यांनी केला.
संतोष देशमुख यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून केजकडे न नेता कळंबच्या दिशेने नेला. तिथे एका महिलेला तयार ठेवले होते. या महिलेशी संतोष देशमुख यांचे संबंध होते आणि याच वादातून देशमुखांची हत्या झाली, असे पोलिसांना दाखवायचे होते. पण मस्साजोग गावातील तरुण रुग्णवाहिकेचा पाठलाग करत होते, त्यामुळे त्यांचा हा प्लॅन फसला,” असे यावेळी गावकऱ्यांनी सांगितले.
Massajog Citizens made serious allegations against Police
दरम्यान, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी पोलिसांवरील केलेल्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे लवकरच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :