Supriya Sule । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने (Santosh Deshmukh murder case) संपूर्ण बीड जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी देशमुखांना न्याय मिळत नसल्याने मस्साजोग या गावचे नागरिक संतप्त झाले आहेत.
अशातच आज शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) सुप्रिया सुळे यांच्यासमोर भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
“आईला वेड लागल्यासारखं झालं आहे. त्या दिशेला इथून पुढं कसं कुणाला पाठवणार? आम्ही खूप आनंदी होतो, पण आता कठीण झालं आहे. कुणी वेळेवर जेवत नाही, झोप लागत नाही. ताई या दुःखातून सावरणं कठीण आहे,” अशी हृदयद्रावक व्यथा वैभवी देशमुखने मांडली.
तसेच सुप्रिया सुळे यांच्यासमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा बांध फुटला. “संतोष देशमुखने सगळ्या गावाचं चांगलं केले. भांडणादिवशी तो म्हणाला असेल मला मारू नका. पण त्याला मारले. माझ जसं लेकरू आहे तसं या मारेकऱ्यांना लेकरू असेल ना? त्यांना मुलं, बायका नसेल का? माझं लेकरू खूप चांगलं होतं. मी आता काय करू? त्याला कुठे शोधू? असा सवाल संतोष देशमुखांच्या आईने उपस्थित केला.
Supriya Sule meet Santosh Deshmukh family
पोलिसांनी आमची तक्रार लवकर घेतली नाही. त्यांनी आम्हाला चुकीच्या दिशेला पाठवलं. पटकन जामीन होईल अशी कलमं पोलिसांनी दाखल केली, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांच्यासमोर गावकऱ्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :