Supriya Sule । शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या बीड आणि परळी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्या संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर टीका केली आहे.
“सुरेश धस यांच्याकडे मी कधीच पक्ष म्हणून पाहिले नाही. माणुसकीच्या नात्याने ते बोलत आहेत असा माझा विश्वास होता. माझी सुरेश धस यांच्याकडून खूप अपेक्षा होती, कारण ते खूप पोट तिडकेने माध्यमांसमोर बोलत होते. ते देशमुख आणि मुंडे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही,” असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले.
तसेच त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यावरही वक्तव्य केले. “सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजीनामा दिला. आर आर आबांनी वक्तव्य केले म्हणून राजीनामा दिला. त्या पद्धतीने इतरांनी देखील निर्णय घ्यावा,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
Supriya Sule on Suresh Dhas and Dhananjay Munde Meeting
“मला कधीच वाटलं नव्हते की सुरेश धस त्यांना जाऊन भेटतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच म्हणाले की त्यांची चार तास मीटिंग झाली. पण मॅनेजमेंट अशा बातमी येत असतील तर अस्वस्थता माजणार आहे. धसांना मॅनेज केले जात आहे का? या प्रश्नाचे उत्तर बावनकुळे यांना देता येईल,” असा दावा सुळे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :