🕒 1 min read
Mumbai Indians । आयपीएलच्या 18 व्या (IPL 2025) हंगामाच्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा झाली असून 22 मार्चला पहिला सामना खेळवला जाणार आहे. आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी त्यांच्या संघात मोठा बदल केल्याचे पाहायला मिळते.
आयपीएल 2025 मध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघाचा कर्णधार असणार आहे, विशेष म्हणजे मागील हंगामात देखील हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. पण त्याला मागील हंगामात फारशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याने चाहत्यांची नाराजी ओढवून घेतली.
यंदाही तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पण तो पहिल्या सामन्याला मुकणार आहे. 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला त्यांचे ओव्हर्स वेळेत पूर्ण करता आले नव्हते.
याच कारणावरून बीसीसीआयच्या नियमांनुसार हार्दिक पांड्यावर एका सामन्याचा बॅन लावला होता. जरी तो आयपीएल 2025 मध्ये कोणत्या दुसऱ्या संघासाठी खेळला असता तरी त्याला एका सामन्याची बंदीला सामोरे जावे लागले असते. त्याच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सचे नेतृत्व (Mumbai Indians captain) करताना दिसेल.
IPL 2025 Mumbai Indians Complete Schedule
1) 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नईशी मुंबईत होणार आहे.
2) 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना गुजरात टायटन्सशी गुजरातमध्ये होणार आहे.
3) 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी मुंबईत होणार आहे.
4) 4 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत लखनौमध्ये होणार आहे.
5) 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे.
6) 13 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सहावा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर दिल्लीत होणार आहे.
7) 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सातवा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत मुंबईत होणार आहे.
8) 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा आठवा सामना चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत होणार आहे.
9) 23 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा नववा सामना सनरायझर्स हैदराबादशी हैदराबादमध्येच होणार आहे.
10) 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा दहावा सामना लखनौ सुपर जायंट्सबरोबर मुंबईत होणार आहे.
11) 1 मे रोजी मुंबई इंडियन्सचा अकरावा सामना राजस्थान रॉयल्सशी राजस्थानमध्येचे होणार आहे.
12) 6 मे रोजी मुंबई इंडियन्सचा बारावा सामना गुजरात टायटन्सशी मुंबईत होणार आहे.
13) 11 मे रोजी मुंबई इंडियन्सचा तेरावा सामना पंजाब किंग्जशी पंजाबमध्येच होणार आहे.
14) 15 मे रोजी मुंबई इंडियन्सचा चौदावा सामना दिल्ली कॅपिटल्सशी मुंबईत होणार आहे.
MI IPL 2025 Match Where To Watch On TV?
मुंबई इंडियन्सच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
MI IPL 2025 Match Live Streaming Details
मुंबई इंडियन्सचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
दरम्यान, Viacom18 आणि Star India यांचे विलीनीकरण झाले असल्याने जिओचे जियो हॉटस्टार (Jio Hotstar) हे नवीन अॅप आले आहे. पण येथे चाहत्यांना IPL सामन्यांचा मोफत आनंद घेता येणार नाही. जर चाहत्यांना सामने पाहायचे असतील तर पैसे खर्च करावे लागतील.
जर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेऊन आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा असेल तर सबस्क्रिप्शन पॅकची सुरूवात 149 रूपयांपासून सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ऍड फ्री व्हर्जनसाठी तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शन प्लॅन खरेदी करण्यासाठी 499 रुपये प्रेक्षकांना मोजावे लागू शकतात.
Mumbai Indians Squad For IPL 2025
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, दीपक चाहर, विल जॅक्स, मुजीब उर रहमान, मिचेल सँटेनर, रायन रिकल्टन, लिझाड विल्यम्स, रिस टोप्ली, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॉन जेकॉब्स, वेंकट सत्यनारायण पेन्मेत्सा, राज अंगद बावा, श्रीजिथ कृष्णा, अश्विनी कुमार.
महत्त्वाच्या बातम्या :
- IPL Schedule 2025 जाहीर होताच ‘या’ टीमचे प्लेऑफचे तिकीट झाले फिक्स, समोर आली मोठी अपडेट
- कधी होणार Gujarat Titans चा पहिला सामना? जाणून घ्या सामन्यांची संपूर्ण यादी
- कोणासोबत होणार Mumbai Indians चा पहिला सामना? संपूर्ण वेळापत्रक आले समोर, जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










