🕒 1 min read
Mumbai Indians । नुकतेच बीसीसीआयकडून (BCCI) आयपीएलच्या अठराव्या हंगामाचे वेळापत्रक (IPL Schedule 2025) जाहीर करण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (Champions Trophy) आयपीएलचा (IPL 2025) थरार सुरु होणार आहे. यंदा आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत.
आयपीएलचा पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात पार पडणार आहे. तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्जसोबत (Mumbai Indians vs Chennai Super Kings) पार पडणार आहे. जाणून घेऊयात मुंबई इंडियन्स टीमच्या सर्व सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक.
IPL 2025 Mumbai Indians Complete Schedule
1) 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नईशी मुंबईत होणार आहे.
2) 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना गुजरात टायटन्सशी गुजरातमध्ये होणार आहे.
3) 31 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी मुंबईत होणार आहे.
4) 4 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्ससोबत लखनौमध्ये होणार आहे.
5) 7 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. हा सामना मुंबईत होणार आहे.
6) 13 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सहावा सामना दिल्ली कॅपिटल्सबरोबर दिल्लीत होणार आहे.
7) 17 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा सातवा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत मुंबईत होणार आहे.
8) 20 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा आठवा सामना चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत होणार आहे.
9) 23 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा नववा सामना सनरायझर्स हैदराबादशी हैदराबादमध्येच होणार आहे.
10) 27 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सचा दहावा सामना लखनौ सुपर जायंट्सबरोबर मुंबईत होणार आहे.
11) 1 मे रोजी मुंबई इंडियन्सचा अकरावा सामना राजस्थान रॉयल्सशी राजस्थानमध्येचे होणार आहे.
12) 6 मे रोजी मुंबई इंडियन्सचा बारावा सामना गुजरात टायटन्सशी मुंबईत होणार आहे.
13) 11 मे रोजी मुंबई इंडियन्सचा तेरावा सामना पंजाब किंग्जशी पंजाबमध्येच होणार आहे.
14) 15 मे रोजी मुंबई इंडियन्सचा चौदावा सामना दिल्ली कॅपिटल्सशी मुंबईत होणार आहे.
MI IPL 2025 Match Where To Watch On TV?
मुंबई इंडियन्सच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.
MI IPL 2025 Match Live Streaming Details
मुंबई इंडियन्सचे सर्व सामने डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहेत.
Mumbai Indians Squad For IPL 2025
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, दीपक चाहर, विल जॅक्स, मुजीब उर रहमान, मिचेल सँटेनर, रायन रिकल्टन, लिझाड विल्यम्स, रिस टोप्ली, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॉन जेकॉब्स, वेंकट सत्यनारायण पेन्मेत्सा, राज अंगद बावा, श्रीजिथ कृष्णा, अश्विनी कुमार.
महत्त्वाच्या बातम्या :
- IPL Schedule 2025 जाहीर! पहिल्या सामन्यात ‘हे’ संघ येणार आमनेसामने, जाणून घ्या
- Santosh Deshmukh हत्याप्रकरणात भाजपचा हात? Sanjay Raut यांचा मोठा सवाल
- Walmik Karad असणाऱ्या कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, मोठं कारण आलं समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












