Share

Walmik Karad असणाऱ्या कारागृहाचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट, मोठं कारण आलं समोर

by MHD
Structural audit of Walmik Karad custody Beed jail

Walmik Karad । खंडणीप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर कोर्टाने मकोका (Macoca) लावला आहे. वाल्मिक कराड याची राज्याच्या विविध भागात संपत्ती असल्याचीही माहिती समोर आली होती. त्याच्याकडे करोडो रुपयांची संपत्ती कशी आली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

अशातच आता वाल्मिक कराडचा मुक्काम असणाऱ्या बीड जिल्हा कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit of Beed District Jail) करण्यात येणार आहे. एसआयटीने याबाबत सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षकांच्या टीमकडून याचा आढावा घेण्यात येणार आहे.

या कारागृहाचे दहा ते बारा बाबींवर ऑडिट केले जाणार असून हे कारागृह निजामकालीन आहे. त्यामुळे याची इमारत कमकुवत झाली आहे. कारागृहातील सीसीटीव्हीचे नूतनीकरण करायचे आहे. तसेच सुरक्षा यंत्रणा देखील अपडेट करायची आहे.

तसेच आज दुपारी मस्साजोगचे नागरिक आणि देशमुख कुटुंबीय एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी ही बैठक महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Massajog Villagers arrange meeting today

दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी देशमुखांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे नागरिकच आंदोलनाला बसू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर नागरिकांनी आंदोलन केले तर राज्याचे वातावरण पुन्हा एकदा पेटू शकते.

महत्त्वाच्या बातम्या :

A structural audit of Beed District Jail, where Walmik Karad is staying, will be conducted. SIT has given instructions in this regard.

Maharashtra Crime Marathi News

Join WhatsApp

Join Now