Share

Santosh Deshmukh हत्याप्रकरण पुन्हा पेटणार, मस्साजोगमधील हालचाली वाढल्या

by MHD
Massajog Villagers arrange meeting in Santosh Deshmukh murder case

Santosh Deshmukh । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या (Santosh Deshmukh murder case) करण्यात आली. या हत्याप्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला तरीही संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही.

कृष्णा आंधळे (Krishna Andhale) याला देखील अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण मस्साजोगमधील (Massajog) हालचाली वाढण्यास सुरुवात झाली आहे.

आज दुपारी मस्साजोगचे नागरिक आणि देशमुख कुटुंबीय एक महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी ही बैठक महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Massajog Villagers arrange meeting today

दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी देशमुखांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे नागरिकच आंदोलनाला बसू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जर नागरिकांनी आंदोलन केले तर राज्याचे वातावरण पुन्हा एकदा पेटू शकते. त्यामुळे आज मस्साजोगचे नागरिक काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली आहे, परंतु, त्यांनी अचानक अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. त्यामुळे मस्साजोगचे नागरिक संतप्त झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

This afternoon the citizens of Massajog and Santosh Deshmukh family will hold an important meeting. Everyone is paying attention to this meeting.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now
by MHD