Share

“… म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला नसेल”; Ajit Pawar यांचं मोठं वक्तव्य

Dhananjay Munde resignation is being targeted by the ruling party and the opposition. Now Ajit Pawar has also made an indicative statement on the demand for Munde resignation.

by MHD

Published On: 

Ajit Pawar on Dhananjay Munde resignation demand

Ajit Pawar । सत्ताधाऱ्यांसह विरोधकदेखील अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यामुळे धनंजय मुंडेंची कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

“एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये नाव आले तर आपण कारवाई करणार आहोत. ज्यावेळी माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे (Irrigation Scam) आरोप झाले होते त्यावेळी मी राजीनामा दिला होता. कारण माझ्या बुद्धीला ते पटले नाही,” असे अजित पवार म्हणाले.

“1992 सालापासून आजपर्यंत काम करताना मला बदनाम करण्यात आले. माझी प्रतिमा खराब केली. इतक्या व्यवस्थितपणे काम करत असताना आरोप होत असल्याने मी राजीनामा दिला होता. काही जणांवर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. पण आताची परिस्थिती वेगळी आहे,” असे म्हणत अजित पवार यांनी एकप्रकारे मुंडेंची पाठराखण केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावं. पुरावा नसेल म्हणून मुंडेंनी राजीनामा दिला नसेल. धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितले आहे की यात माझा काहीच संबंध नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh murder case) सांगितले आहे की दोषींवर कारवाई केली जाईल. आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही. जनतेने आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar on Dhananjay Munde

दरम्यान, एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे आता अजित पवार यांनी देखील मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे मुंडे राजीनामा देणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही