Suresh Dhas । भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अचानक अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली. याची माहिती समोर येताच विरोधकांनी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. मनसेनेही (MNS) या भेटीवर टीका केली आहे.
“बीड जिल्ह्यात सुरेश धस यांच्याविषयी साधारण समज आहे की, असा कोणताही राजकीय नेता नाही, ज्याला धस यांनी राजकीय दृष्ट्या फसवणूक केली नाही. या जिल्ह्यात दोन गट होतात की काय? अशा टोकावर परिस्थिती पोहोचली होती. सुरेश धस यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर बरंच तोंडसुख घेतले,” असा दावा मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला.
“विधानसभा निवडणुकीतील भ्रष्टाचाराविषयी त्यांनी बोलून जनमत आपल्या बाजूने घेतले. पण आता असं काय झाले की त्यांना धनंजय मुंडेंची भेट घ्यावी लागली. धस यांनी अनेकांचा विश्वासघात केला आहे. आष्टीकडे लक्ष द्यावे लागेल असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी(Pankaja Munde) केले असल्याने या भीतीपोटीच त्यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली नाही ना?,” असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.
Prakash Mahajan criticize Dhananjay Munde, Suresh Dhas Bajrang Sonwane
पुढे ते म्हणाले की, “धनंजय मुंडे, सुरेश धस, बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) हे एकाच गँगमधील आहेत. त्यांना एकमेकांच्या अनेक गोष्टी माहिती आहेत. अजित पवारांनी (Ajit Pawar) धनंजय मुंडेंना कोर कमिटीत घेतल्याने त्यांचे काही होणार नाही. म्हणून धस यांनी माघार घेतली. मुंडेंचे रक्षक मुख्यमंत्री असल्याने धसांनी माघार घेतली असावी,” असा दावाही प्रकाश महाजन यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :