Bhaskar Jadhav । मागील काही दिवसांपासून ठाकरे गटाला (Thackeray group) गळती लागली आहे. या गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. आमदार भास्कर जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. “भास्कर जाधव यांचे आम्हाला भविष्यात मार्गदर्शन मिळणार असेल तर आम्ही स्वागत करू,” असे वक्तव्य मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केले होते.
त्यातच काल भास्कर जाधव यांनी मला क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, असे वक्तव्य केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यावर आता भास्कर जाधव यांनी पत्रकारपरिषदेत (Bhaskar Jadhav PC) स्पष्टीकरण दिले आहे.
“मी माझ्या मागील ४३ वर्षात क्षमतेप्रमाणे पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, असा माझा शब्दप्रयोग आहे. कुणी दिली नाही, कोणत्या पक्षाने दिली नाही, कोणत्या नेत्याने दिली नाही, असा माझा आक्षेप नाही. हे फक्त माझ्याच वाटेला आले आहे, यातला भाग नाही. हे माझे दुर्देव असून हा दोष मी माझा माझ्याकडे घेतला आहे,” असा खुलासा भास्कर जाधव यांनी केला.
“मी कधीच नाटक केले नाही. रडत बसलो नाही. जे असेल ते सत्य. मिळाले तर माझ्या नशिबाने, नाही मिळाले तर नशिबाने. मी कोणतेही पद मिळवण्यासाठी नाटक केले नाही. मी हे सगळं पद मिळवण्यासाठी करतोय हा माझ्या मनाला लागलेला विषय आहे,” असेही भास्कर जाधव म्हणाले.
Press conference of Bhaskar Jadhav to clarify about leaving the Thackeray group
पुढे ते म्हणाले, “४३ वर्षांची माझी राजकीय कारकिर्द झाली असून या कारकिर्दीच्या उत्तरार्धाला लागलेला मी कार्यकर्ता आहे. अडचणीच्या काळामध्ये आपल्या हातून चांगलं काहीतरी घडावं यासाठी माझी तळमळ आहे,” असे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :