Share

Walmik Karad लढवणार होता विधानसभा निवडणूक, पण झालं भलतंच…

Walmik Karad has been booked and is being interrogated thoroughly. It is being discussed that Valmik Karad was going to contest the assembly elections.

by MHD

Published On: 

Walmik Karad was preparing to contest Vidhansabha election 2024

Walmik Karad । सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे (Santosh Deshmukh murder case) बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला आहे. या हत्याप्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला तरी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) पोलिसांना सापडला नाही. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

वाल्मिक कराडवर मकोका लावला असून त्याच्याकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच वाल्मिक कराड विधानसभेची निवडणूक लढवणार होता, अशी चर्चा बीडमध्ये सुरु आहे. यावरून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आष्टी पाटोदा मतदारसंघातून वाल्मिक कराडने निवडणूक लढण्याची तयारी केली होती. पण महायुतीकडून भाजपचे सुरेश धस (Suresh Dhas) यांना संधी देण्यात आली. याचाच राग सुरेश धस यांच्या मनात असल्याची चर्चा आहे. धस यांच्या पत्नी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

Walmik Karad was preparing to contest Assembly Elections from Ashti Patoda constituency

हा गुन्हा वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून दाखल करायला लावला, असा संशय सुरेश धस यांना होता. त्यामुळेच सुरेश धस यांच्या मनात वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राग होता, अशी चर्चा बीड जिल्ह्यात असते.

दरम्यान, नुकतीच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची गुप्तपणे भेट घेतल्याची माहिती वाऱ्यासारखी राजकीय वर्तुळात पसरली आहे. यावरून विरोधकांनी सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत आहे. यावरून राजकीय वर्तुळ तापल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही