Mahadev Munde । बीडच्या परळी शहरातील व्यापारी महादेव मुंडे यांची परळी तहसील कार्यालयासमोरच हत्या (Mahadev Munde murder case) करण्यात आली होती. या हत्येला १५ महिने उलटले तरी पोलिसांना एकही आरोपीला पकडण्यात यश आले नाही.
यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी पोलिसांवर राजकीय दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जात होता. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची मागणी केली होती.
याप्रकरणी बीड पोलीस अॅक्शन मोडवर आले असून तपासासाठी पाच सदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. मागील तीन दिवसापासून विशेष पथक आणि डीवायएसपी परळीमध्ये कसून चौकशी करत आहे. या पथकाने अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
Mahadev Munde murder case Investigation in Beed
त्यामुळे आता महादेव मुंडे यांचे मारेकरी आरोपी लवकर अटक होतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपींना अटक केल्यांनंतर त्यांना काय शिक्षा होते? याकडेदेखील मुंडे कुटुंबियांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तपासाबाबत पोलिसांना अधिक माहिती विचारली असता त्यांनी तपास पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही माहिती देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :