Share

“Dhananjay Munde यांनीच केली आरोपींची पाठराखण”, कुणी केला मोठा दावा?

Dhananjay Munde has been seriously accused of supporting the accused. It is important to see how Munde reacts to this.

by MHD

Published On: 

Dhananjay Munde protected accused claim by Dyaneshwari Munde

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या समोरील अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत. एकीकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे.

“धनंजय मुंडे साहेबांनी आणि वाल्मिक कराडने (Walmik Karad) आरोपींची पाठराखण केली आहे. त्यांनी गुन्हा केला आहे की नाही, हे माहिती नाही. पण आरोपींची पाठराखण या दोघांनीच केली आहे. परळीमध्ये दुसरं कुणीही आरोपींची पाठराखण करु शकत नाही,” असा दावा परळीतील व्यापारी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी केला आहे.

“आमच्यासमोर धनंजय मुंडे एसपींना फोन करायचे आणि आरोपी का पकडत नाहीत असे विचारायचे. पालकमंत्र्यांनी फोन करूनही एसपी सर काहीच करत नव्हते. म्हणजे पाठराखण कोण करत आहे? हे सिद्ध झालं. त्या पालकमंत्र्यांच्या हाताने केसचं काही झालं नाही तर आताचे पालकमंत्री काय करतील? असा सवालही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी उपस्थित केला.

“मी पंधरा महिने वाट बघितली असल्याने आता मी मंगळवारपासून बीडमध्ये उपोषणाला बसणार आहे. माझे पती प्लॉटिंगचा व्यवसाय करायचे. परळीमधील शंकर पार्वती नगरमध्ये वाल्मिक कराडच्या घराजवळच्या प्लॉटिंगमध्ये सौदा केला आणि त्यातूनच खून झाला असावा,” असे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.

Dnyaneshwari Munde on Dhananjay Munde

“त्यामुळे मी आता उपोषणावर ठाम आहे. जरी आता पालकमंत्री आले आणि मुख्यमंत्री आले तरी मी आरोपींना अटक झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही,” असा दावा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही