Dhananjay Munde । अजित पवार गटाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून अडचणी वाढत चालल्या आहेत. विरोधकांनी देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच आता धनंजय मुंडेंबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वीच करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टात धाव घेत ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. यामध्ये धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
करुणा मुंडे यांनी केलेल्या याच तक्रारीच्या आधारे धनंजय मुंडे यांना परळीच्या फौजदारी न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात (Criminal Court of Parli) महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
या सुनावणीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे जर आज धनंजय मुंडे न्यायालयात हजर राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले आहे.
Dhananjay Munde Arrest Warrant
त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अटक वॉरंट टाळण्यासाठी धनंजय मुंडे न्यायालयात हजर राहणार की नाही? याकडे देखील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :