भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा सहा विकेट्सनी पराभव करत, सलग दुसरा विजय मिळवला. या विजयामुळे भारत उपांत्य फेरीच्या जवळ गेला आहे. न्यूझीलंडनंतर भारताकडून पराभव झाल्याने पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीतून ‘आऊट’झाला आहे.
भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा डाव २४१ धावांत संपवला. त्यानंतर, विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील उत्कृष्ट खेळी करत १११ चेंडूत १०० धावा केल्या, त्यात ७ चौकारांचा समावेश होता. त्याने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी धावांची मजबूत भागीदारी केली. त्याआधी, त्याने शुभमन गिलसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली. श्रेयस आणि शुभमन यांनीही चांगली खेळी केली.
पाकिस्तानच्या डावात, बाबर आझम आणि इमाम उल हक यांनी चांगली सुरुवात केली, पण हार्दिक पांड्याने बाबरला २६ चेंडूत २३ धावांवर बाद केले. त्यानंतर इमाम उल हकही २६ चेंडूत १० धावांवर बाद झाला. ४७ धावांत दोन विकेट गमावल्यानंतर, सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी १०४ धावांची भागीदारी केली. शकीलने अर्धशतक झळकावले, पण अक्षर पटेलने रिझवानला ७७ चेंडूत ४६ धावांवर बाद केले. त्यानंतर, शकील ७६ चेंडूत ६२ धावा करून हार्दिक पांड्याचा बळी ठरला. पाकिस्ताचे इतर फलंदाज धावसंख्या वाढवण्यात अपयश ठरले.
Ind vs Pak । India beat pakistan by 6 wickets
विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१ वे वनडे शतक पूर्ण केले आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कॅप्टन आणि विकेटकीपर), इमाम उल हक, बाबर आझम, सौद शकील, सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ आणि अबरार अहमद.
महत्वाच्या बातम्या