Santosh Deshmukh । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (Santosh Deshmukh murder case) अडीच महिने होऊन गेले आहेत. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. यामुळे येत्या 25 तारखेला मस्साजोग या गावचे नागरिक अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका बजावली होती. अशातच आता त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणात धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातले पोलीस अधिकारी आणि फकराबादचे सरपंच नितीन बिक्कड सहभागी आहे,” असा मोठा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
“हत्या करून आरोपी वाशिम मार्गे गेले आणि त्यांना पळून जाण्यासाठी पोलीस अधिकारी आणि नितीन बिक्कड यांनी मदत केली. त्या सर्वांना मकोका लावून त्यांना हत्या प्रकरणात सहआरोपी करा. याबाबतचे पुरावेही आपण दिले आहेत,” असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
सुरेश धस यांच्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मागील अडीच महिन्यापासून सुरेश धस संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी आणि त्यांच्या आकाच्या विरोधात रस्त्यांवरील आंदोलनातही उतरले होते.
Suresh Dhas on Santosh Deshmukh murder case
परंतु, काही दिवसांपूर्वीच सुरेश धस यांनी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतली होती. ही माहिती समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर जहरी टीका केली होती. अशातच आता सुरेश धस पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :