Rohit Sharma | भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपली. विराटने या हायव्होल्टेज सामन्यात शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला. त्याचे हे शतक नाट्यमय पद्धतीने पूर्ण झाले. सामन्याच्या ४२ व्या षटकात विराटला शतकासाठी ६ धावा आणि भारताला विजयासाठी ५ धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदीच्या षटकात अनेक वाईड चेंडू टाकल्यामुळे विराटच्या शतकात अडथळा निर्माण झाला. पण विराटने हट्ट सोडला नाही. जेव्हा भारताला विजयासाठी ४ धावांची आणि विराटला शतकासाठी ५ धावांची गरज होती, तेव्हा तो ९५ धावांवर होता. त्याने पुढच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि ९६ धावांवर पोहोचला.
यावेळी ड्रेसिंग रूममधून रोहित शर्माने विराटला इशारा दिला, “अरे, सिक्स मार!” रोहितच्या या मेसेजनंतर अक्षर पटेलने पुढच्या चेंडूवर एक धाव घेतली आणि विराटला स्ट्राईक दिली. विराटने दणदणीत चौकार लगावत आपले शतक पूर्ण केले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून विराटने केवळ भारताला विजयच दिला नाही, तर टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जाण्याचा मार्ग सोपा केला. दुबईच्या मैदानावर शतक पूर्ण केल्यानंतर विराटने रोहित शर्माकडे बोट दाखवत म्हटले, “मैं हूं ना.” अशी मजेशीर प्रतिक्रिया त्याने दिली.