Sanjay Raut । काल मराठी साहित्य संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटामध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असा गंभीर आरोप केला होता. यावरून त्या ठाकरे गटाच्या चांगल्याच निशाण्यावर आल्या आहेत.
आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य म्हणजे विकृती. नीलम गोऱ्हे म्हणजे निर्लज्ज बाई. या बाईचं काय कर्तृत्व आहे?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत यांनी मर्सिडीजवरूनही गोऱ्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. “पुण्यातील अशोक हर्नल यांची मुलाखत घ्या मग तुम्हाला मर्सडिज प्रकरण काय आहे हे समजेल. नीलम गोऱ्हे विश्वासघाती बाई आहे. हा सभागृहाचा विषय नसल्याने हक्कभंगाविषयी मला सांगू नका. त्यांच्यावर राज्याने हक्कभंग आणला पाहिजे, ” अशी मागणी राऊत यांनी केली.
“बाळासाहेबांनी तुम्हाला आमदार केले नाही. कोणती बाई तुम्ही पक्षात आणली? असे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणाले होते. जाताना ही बाई ताटात घाण करून गेली. गोऱ्हे लक्षवेधी घ्यायला किती पैसे घेतात?,” असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Sanjay Raut On Neelam Gorhe
दरम्यान, नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटावर टीका करणे चांगलेच भोवले आहे. संजय राऊत यांनी त्यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. यावर आता नीलम गोऱ्हे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले