Share

करुणा मुंडेंमुळे Dhananjay Munde पुन्हा अडचणीत, ‘या’ दिवशी कोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी

A few days ago, Karuna Munde filed an online complaint against Dhananjay Munde.

by MHD

Published On: 

petition filed by Karuna Munde against Dhananjay Munde

🕒 1 min read

Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. येत्या 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यादरम्यान विरोधक पुन्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात.

अशातच आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहेत. काही दिवसांपूर्वीच करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टात धाव घेत ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवली असल्याचा आरोप केला होता.

याबाबत आज परळीच्या फौजदारी न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे होते. याबाबत आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालय काय निर्णय देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “धनंजय मुंडे साहेबांनी आणि वाल्मिक कराडने आरोपींची पाठराखण केली आहे. त्यांनी गुन्हा केला आहे की नाही, हे माहिती नाही. पण आरोपींची पाठराखण या दोघांनीच केली आहे, ” असा दावा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे.

Resolution on Dhananjay Munde resignation

तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ठराव मांडण्यात आलेला आहे. यावर आता धनंजय मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही