🕒 1 min read
गेल्या काही दिवसांपासून AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि आलिया भट्ट यांचेही असे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. आता अभिनेत्री आणि गायिका आर्या आंबेकर यांच्यासोबतही असेच काहीतरी घडले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओो वायरल होत आहे, ज्यामध्ये आर्या बोलताना दिसत आहेत. परंतु, “मी असे काहीही बोलले नाही,” असे म्हणत आर्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना आर्या म्हणते, “हा काय मूर्खपणा आहे? माझ्या कार्यक्रमात मी जे बोलले आहे, ते म्यूट करून तुम्ही माझ्या नावावर काहीतरी वेगळंच बोलल्यासारखं दाखवलं आहे. जे मी कधीच बोलले नाही. या विषयाबद्दल मला काहीही माहिती नाही.” आर्या पुढे म्हणाली, “मी बिग बॉस शो पाहत नाही आणि कधीच पाहिलेलं नाही. मला त्या शोमधील कोणताही स्पर्धक माहीत नाही. तुम्ही हे जे केलं आहे, त्याबद्दल मी तुमच्याविरुद्ध खटला दाखल करू शकते. अशा चॅनेलला 50 हजार सबस्क्राइबर्स कसे असतात?”
Aarya Ambekar gets angree
वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये “पंढरीनाथ दादा सोडलं तर जागेवर स्थिर कोणाचंचं चित्त नाही…” असे लिहिले होते. यावरून आर्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मस्साजोगमध्ये हालचाली वाढल्या, बडी मंडळी Dhananjay Deshmukh यांच्या भेटीला, नेमकं कारण काय?
- “Dhananjay Munde यांनीच केली आरोपींची पाठराखण”, कुणी केला मोठा दावा?
- Dhananjay Munde यांच्या अडचणी वाढल्या! विद्रोही साहित्य संमेलनात राजीनाम्याबाबत ठराव