Dhananjay Munde । सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या हत्याप्रकरणाचे संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहे. याच हत्याप्रकरणांमुळे मागील अडीच महिन्यांपासून राज्याचे राजकीय चित्र देखील पालटले आहे.
विरोधकांनी अजूनही अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विधानसभा निवडणुकीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी केला आहे. याप्रकरणी आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
अशातच आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये 19 व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनात (Vidrohi Sahitya Sammelan) ठराव मांडण्यात आलेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Resolution on Dhananjay Munde resignation
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोहोचलेल्या गुन्हेगारांना तातडीने शिक्षा केली जावी. चौकशी निपक्षपाती होण्यासाठी नैतिकतेचा भाग म्हणून या निगडित मंत्र्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावे, असा ठराव धनंजय मुंडेंचे नाव न घेता संमत केला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. यावर आता धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :