KKR । IPL च्या १८ व्या हंगामाच्या वेळापत्रकाची (IPL Schedule 2025) घोषणा लवकरच केली जाईल. IPL मधील संघ हळूहळू आपले कर्णधार जाहीर करत आहेत. अशातच आता गेल्यावर्षीचा विजेता संघ केकेआर लवकरच आपला कर्णधार जाहीर करणार आहे.
क्रिकइन्फोच्या अहवालानुसार असे म्हटले जात आहे की, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला आपला नवीन कर्णधार करू शकते. परंतु, अजूनही कर्णधारपदाबाबत फ्रेंचायझीने घोषणा केली नाही. फ्रेंचायझी लवकरच कर्णधारपदाची घोषणा करू शकते.
महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या मेगा लिलावाच्या (Mega Auctions of IPL) पहिल्या फेरीत अजिंक्य रहाणे कोणताही खरेदीदार सापडला नव्हता. परंतु, दुसर्या फेरीत कोलकाता नाईट रायडर्सने त्याला विकत घेतले. अजिंक्य रहाणे हा आयपीएल २०२५ मधील ९वा सर्वात वयस्कर खेळाडू असेल.
ज्यावेळी तो २०२५ च्या आयपीएलमध्ये खेळेल तेव्हा त्याचे वय ३६ वर्षे १७८ दिवस असेल. त्याने आतापर्यंत १८५ आयपीएल सामने खेळले असून त्याने या सामन्यांमध्ये ४,६४२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ३०.१४ धावा आहे.
KKR Squad for IPL 2025
रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, वेंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अँरिक नोरखिया, अंगकृष रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लवनीथ सिसोदिया, अजिंक्य रहाणे, अनुकुल रॉय, मोईन अली, उमरान मलिक
महत्वाच्या बातम्या :