Karuna Munde । अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) मागील काही दिवसांपासून अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतीच भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे.
या भेटीवर करुणा मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh murder case) सगळ्यांनी जातपात न बघता लक्ष घातले होते. पण काहींनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि सुरेश धस यांच्यात वाद पेटवण्याचे काम केले होते. धनंजय मुंडे यांनीच सुरेश धसांना बोलावून घेऊन भेटीची बातमी बाहेर काढली. धसांची प्रतिमा खराब करण्याचे काम धनंजय मुंडे यांनी केले आहे,” असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. (Karuna Munde on Dhananjay Munde)
“आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटून त्यांना धनंजय मुंडेंचे माझ्याकडे असलेले पुरावे देणार आहे. माझ्याकडे ब्रह्मास्त्र असून ते आता आपण मुंडेंविरोधात सोडणार आहे. भगिरथ बियाणी प्रकरण त्यासोबत आणखीही अनेक खुनांच्या प्रकरणांची २७ वर्षांपासूनच माहिती आहे. तो अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट आहे. मुंडे जे सांगतात, तेच त्यांच्या पक्षात होते,” असा दावा करुणा मुंडे यांनी केला.
Karuna Munde criticize Dhananjay Munde
पुढे त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांचे थेट कोणासोबत वैर नसताना सगळ्या पक्षाचे लोक त्यांचा राजीनामा मागत आहेत. कारण संतोष देशमुख यांची खूपच निर्घृणपणे हत्या झाली आहे. यातही हे लोक राजकारण करत असतील तर वाईट आहे,” असेही करुणा मुंडे म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या :