Share

Sanjay Raut यांचा गंभीर आरोप, म्हणाले; “सुरेश धस, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे…”

by MHD
Sanjay Raut criticizes Suresh Dhas, Dhananjay Munde and Walmik Karad

Sanjay Raut । संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये (Santosh Deshmukh murder case) भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परंतु, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्तबैठक झाल्याची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

धस-मुंडे भेटीवरून खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस हे देशमुख कुटुंबीयांना न्याय देतील, असे वाटत होते. त्यावेळी मला लोकांनी समजावले होते की तुम्ही धसांची बाजू घेऊ नका. ते कधीही पलटी मारू शकतात. मुंडे, धस आणि वाल्मिक कराड (Walmik Karad) एकच असून लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. दुर्दैवाने हे सत्य होताना पाहायला मिळत आहे,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.

“एका विद्यमान आमदाराने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडून व्यापार केला आहे. ती बिचारी लहान मुले धसांच्या मागे धावत होती की, हा माणूस आम्हाला न्याय देऊ शकतो. धस यांनी हे कृत्य केले असेल तर देव त्यांना क्षमा करणार नाही,” असा दावा राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut on Suresh Dhas, Dhananjay Munde and Walmik Karad

पुढे राऊत म्हणाले की, “जर धस यांनी असा खोटारडेपणा करून देशमुख कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खुपसला असेल तर हे राज्याची जनता लक्षात ठेवेन. तुम्ही जे कृत्य केलेले आहे ते पाप आहे आणि त्या पापाला क्षमा नाही,” असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशिवाय इतर कोणालाही भेटलो नसल्याची माहिती दिली आहे. तरीही राजकीय वर्तुळात सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

As soon as the information about the secret meeting of Suresh Dhas and Dhananjay Munde came to light, Sanjay Raut has targeted them and made serious allegations against them.

Maharashtra Marathi News Politics

Leave a Comment