Chhaava । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘छावा’ सिनेमा काल सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा दाखविण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत होते.
या सिनेमात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandana) महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा रिलीज होताच पहिल्या दिवशी करोडो रुपयांचा गल्ला जमवला.
विकी कौशलने आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल 31 करोड रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या घवघवीत यशामुळे हा सिनेमा नक्कीच इतर सिनेमांचे रेकॉर्ड मोडू शकतो.
महत्त्वाचे म्हणजे विकी कौशलचा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा छावा हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याच्या उरी आणि बॅड न्यूज या सिनेमाने अनुक्रमे 9 आणि 8 कोटींची कमाई केली होती. परंतु, ‘छावा’ ने त्याच्या दोन्ही सिनेमांचा रेकॉर्ड मोडल्याचे पाहायला मिळत आहे.
Chhaava Box Office Collection
तसेच या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंगमध्येच तब्बल 5 लाख तिकीट विक्री (Chhaava advance booking collection) झाली होती. यातूनच सिनेमाने 13.70 कोटी कमाई झाली होती. बजेटबाबत बोलायचे झाले तर या सिनेमाचे बजेट 130 कोटी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी तर मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :