AR Rahman : ‘छावा’ वादावर रेहमान यांनी सोडलं मौन; म्हणाले, “कधी कधी हेतूंचा…”

ए. आर. रेहमान यांनी ‘छावा’ सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. “माझा हेतू कुणालाही दुखावण्याचा नव्हता,” असं म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

Published On: 

AR Rahman Reaction: Chhava Movie Controversy and Official Statement

AR Rahman : संगीताच्या दुनियेतील ‘जादूगार’ अशी ओळख असलेल्या ए. आर. रेहमान यांच्या एका वक्तव्याने बॉलीवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती, हे तुम्हाला आठवतंय? ऑस्कर विजेत्या रेहमान यांनी ‘छावा’ सिनेमाबद्दल केलेल्या विधानावरून मोठा गदारोळ झाला होता. जावेद अख्तर, शान आणि कंगना राणौत यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. पण आता या सर्व प्रकरणावर स्वतः ए. आर. रेहमान (AR Rahman Reaction) यांचं स्पष्टीकरण समोर आल आहे.

AR Rahman Reaction On Chhava Movie

रेहमान यांनी या वादावर अखेर मौन सोडलं असून आपली बाजू स्पष्ट केली आहे. या संपूर्ण वादावर पडदा टाकताना रेहमान यांनी अतिशय मोजक्या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “प्रिय मित्र… संगीत कायम माझ्यासाठी आनंद साजरा करण्याचा आणि संस्कृतीचा सन्मान करण्याचं माध्यम आहे… भारत माझी प्रेरणा आहे, माझे गुरु आहेत आणि माझं घर देखील आहे.”

रेहमान यांनी पुढे कबूल केलं की संवादात कधीकधी गोंधळ होऊ शकतो. ते पुढे म्हणतात, “मी समजू शकतो की कधी–कधी विचारांमध्ये गैरसमज होऊ शकतात. पण माझं लक्ष्य कायम संगीताच्या माध्यमातून यशाकडे जाणं हेच आहे.”

‘छावा’ सिनेमाला रेहमान यांनी ‘फूट पाडणारा सिनेमा’ (Divisive) म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता सारवासारव करताना रेहमान यांनी म्हटलंय की, “माझा कधीही कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि मला आशा आहे की लोक यावर माझ्याशी सहमत होतील.” एक भारतीय म्हणून आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं.

विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘छावा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. मात्र, रेहमान यांच्या विधानामुळे सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं होतं. आता रेहमान यांच्या या स्पष्टीकरणानंतर हा वाद निवळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही