🕒 1 min read
Suresh Dhas । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. याप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, काल त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सुरेश धस हे सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. अशातच धस यांनी मुंडेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या भेटीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी माहिती दिली होती.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुरेश धस यांना पूर्ण पाठबळ दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या काही कारवाया झाल्या, चौकशी झाली, त्यांची मागणी सुरेश धस यांनी केली. त्या सर्व मागण्या फडणवीस यांनी पूर्ण केल्या आहेत. धस आणि धनंजय मुंडे यांनी एकत्र काम केले तर चांगला न्याय मिळू शकतो,” असा दावा बावनकुळे यांनी केला.
Massajog Citizen On Chandrasekhar Bawankule
त्यांच्या या वक्तव्यावरून आता मस्साजोग गावचे नागरिक आक्रमक झाले आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट चंद्रशेखर बावनकुळे यांनीच घडवून दिली असा आरोप नागरिकांनी केला आहे. “धस आणि मुंडे भेट घडवून आणण्यापूर्वी बावनकुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आमच्या गावाची काय परिस्थिती आहे हे पाहायला हवे होते. कारवाई संदर्भात बोलायला पाहिजे होते. त्यांनी मुद्दाम ही भेट घडवून आणली,” असा आरोप नागरिकांनी केला आहे.
“समाजाचे नेतृत्व म्हणून आम्हाला मनोज जरांगे पाटील हवे आहेत .हे प्रकरण लावून धरण्यासाठी आम्हाला सुरेश धसही हवे आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि देवेंद्र फडणवीस यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकदा भेट घालून द्यावी. म्हणजे आम्ही या केस मधून विड्रॉल होतो,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- बॉक्स ऑफिसवर Chhaava चा बोलबाला, पहिल्या दिवशी जमवला करोडोंचा गल्ला
- महापालिका निवडणुकीसाठी BJP ने दिला स्वबळाचा नारा? पडद्यामागं राजकीय हालचालींना वेग
- चाहत्यांना मोफत पाहता येणार नाही IPL 2025 चे सामने, मोजावे लागणार ‘इतके’ पैसे; जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










