Share

“सुरेश धस तडजोड करणार…”; Supriya Sule यांचं ‘त्या’ भेटीवरून मोठं वक्तव्य

by MHD
Supriya Sule reaction on Suresh Dhas and Dhananjay Munde meeting

Supriya Sule । भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) सतत अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप करत असतात. यामुळे राजकीय वातावरण देखील तापले आहे. अशातच सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची अचानक भेट घेतली. याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत.

शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. “सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला. भ्रष्टाचार, वसुली यासारख्या अनेक गोष्टी घडल्या. परंतु राज्य सरकारने यावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. राज्यातील परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. सुरेश धस हे तडजोड करणार नाहीत. असा माझा विश्वास आहे,” असे वक्तव्य सुळे यांनी केले आहे.

Supriya Sule on Suresh Dhas

“मी स्वतः 18 तारखेला बीडला जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे. तसेच त्यांना आम्ही सोबत असल्याचा विश्वास देणार आहे. डिपीडीसीमधील भ्रष्टाचाराबद्दल केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चौकशी लावणार असल्याचा शब्द दिला आहे,” असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Supriya Sule on Manikrao Kokate

“कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे (Manikrao Kokate) हे वक्तव्य दुर्दैवी आहे. महायुतीला इतके बहुमत मिळाल आहे पण वाचाळवीरांची संख्या जास्त आहे. यशवंतराव चव्हाण यांचे फोटो बॅनरवर लावले जातात पण त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे,” असा सल्लाही सुळे दिला.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राहुल गांधी यांच्यासोबत माझी भेट झाली आहे. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. एकदा महापालिका निवडणुकीची तारीख ठरली की त्यावर निर्णय होईल. भाजप एकटे लढणार असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या :

It has come to light that Suresh Dhas met Dhananjay Munde suddenly. Supriya Sule has reacted to this.

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment