🕒 1 min read
Raosaheb Danve । मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकीय वातावरण बिघडत चालल्याचे पाहायला मिळत आहे. याला कारण आहे नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य. नुकतेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.
अशातच आता भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रावसाहेब दानवे आणि आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. यामुळे अनेकदा राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.
“सिल्लोडमध्ये पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे. अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या भानगडी केल्याने त्यांचे मंत्रीपद गेले आहे. आपली पार्टी सध्या इतकी मोठी आहे की आपले कार्यकर्ते नुसते थुंकले तरी विरोधक वाहून जातील,” असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
“मी अब्दुल सत्तार या व्यक्ती विरोधात नाही. पण त्यांच्या वागण्याच्या पद्धतीमुळे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील लोक नाराज आहेत. एका विशिष्ट विचारधारेच्या व्यक्तींना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ दिला जात आहे. इतर लोकांना फायदा न मिळू देणे ही त्यांची विचारधारा असून मी त्यांचा विरोध करतो,” असा दावा दानवे यांनी केला आहे.
Raosaheb Danve on Abdul Sattar
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी केलेल्या थुंकीच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून दानवे यांना विरोधक घेरू शकतात. यावर अब्दुल सत्तार यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- धनंजय मुंडेंविरोधात सोडणार कोणतं ब्रह्मास्त्र? Karuna Munde म्हणाल्या; “अनेक खुनांच्या प्रकरणांची…”
- ‘त्या’ भेटीवर Suresh Dhas यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “संतोष देशमुख प्रकरणात कॉम्प्रोमाईज…”
- “सुरेश धस तडजोड करणार…”; Supriya Sule यांचं ‘त्या’ भेटीवरून मोठं वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











