Share

Mahadev Munde हत्या प्रकरणाच्या तपासाची दिशा बदलली? सरकारचा सर्वात मोठा निर्णय

by MHD
Mahadev Munde murder case investigation officer changed

Mahadev Munde । मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणानंतर परळी शहरामध्ये पंधरा महिन्यापूर्वी झालेले महादेव मुंडे हत्या प्रकरण (Mahadev Munde murder case) सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. पोलिसांना याप्रकरणातील एकही आरोपीला पकडता आले नाही.

मागील काही दिवसांपासून या हत्याप्रकरणाची चौकशी केली जात आहे. अशातच आता या प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. यापूर्वी दोन वेळा तपास अधिकारी बदलला होता.

अशातच आता तिसऱ्यांदा तपास अधिकारी बदलल्याने सरकारवर सवाल उपस्थित केले जात आहेत. सुरुवातीला याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करत होती. त्यानंतर गेवराईचे पोलीस उपाधीक्षक एमडी राजगुरु यांच्याकडं तपास सोपवला.

त्यानंतर काल अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे तपास वर्ग केला होता. पण काही तासांच्या आत तपास अधिकारी पुन्हा बदलले आहेत. केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना (Kamlesh Meena) हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

Investigation officer changed in Mahadev Munde murder case

केवळ महिनाभरातच या प्रकरणात तीन तपास अधिकारी बदलल्याने सरकारवर सवाल उपस्थित केले जात आहेत. याप्रकरणी आता महादेव मुंडे यांचे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

The investigating officer in the Mahadev Munde murder case has been transferred again. The investigating officer had been changed twice earlier.

Crime Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now