🕒 1 min read
Prashant Koratkar । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला अखेर तेलंगणामधून अटक (Prashant Kortkar Arrested) करण्यात आली आहे.
जवळपास एक महिन्यापासून पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेत होते. पण कोरटकर महिनाभर कोठे लपून बसला होता? याची माहिती समोर आली आहे. कोरटकरला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस हे त्याच्या नागपूर येथील घरी गेले होते.
पण तिथे तो घरी नसल्याचे पोलिसांना समजले. त्याचवेळी त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अंतरीम जामिनावर असताना कोरटकर हा नागपूर आणि चंद्रपूरमध्येच असल्याची माहिती तपासातुन समोर आली आहे.
13 आणि 14 मार्च रोजी तो चंद्रपूरमध्ये एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. महत्त्वाचे म्हणजे एका बुक्कीने त्याला हे हॉटेल बुक करून दिले होते. त्यावेळी त्याला एक पोलीस अधिकारी भेटला. 14 मार्च रोजी कोरटकर सायंकाळच्या सुमारास नागपूरमधील त्याच्या घरी आला होता.
Where was Prashant Koratkar was hiding before Arrest
22 मार्च रोजी लूक आउट सर्क्युलर जारी करण्यात आले. पोलिसांनी बुकी धीरज चौधरीला ताब्यात घेताच त्याने कोरटकर कोठे आहे? याची माहिती दिली. दरम्यान, कोरटकर महिंद्रा एसयूव्ही 700 या गाडीने तेलंगणा येथे पळून गेल्याची माहिती समोर आली. याच माहितीच्या आधारे कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातील मंचरियालम येथून अटक केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- “घटस्फोट आता महागात पडेल”, Saif Ali Khan असं का म्हणाला?
- लखनऊच्या तोंडचा घास पळवणारा Ashutosh Sharma आहे तरी कोण? जाणून घ्या
- Samsung Galaxy S25 Ultra वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट, फिचर्स आहे एकच नंबर









