Sushma Andhare । कुणाल कामरा (Kunal Kamra) या कॉमेडियनवरुन राज्याचे राजकीय वर्तुळ चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर सादर केलेल्या कवितेवरून शिंदे गटासह शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे व्हिडिओ शेअर करत कुणाल कामराच्या कवितेच्या ओळी गायल्या आहेत. एकप्रकारे अंधारे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. यावर आता शिंदे गट काय उत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
“ज्यावेळी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेबांबद्दल अतिशय अवमानकारक वक्तव्य केले त्यावेळी तुमची हीच चिडचिड कुठे गेली होती? आपटेमुळं शिवरायांचा पुतळा पडला, तेव्हा त्याचं कार्यालय का फोडलं नाही?,” असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला.
“राहुल सोलापूरकरने (Rahul Solapurkar) शिवरायांनी लाच घेतली, असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली त्यावेळी त्याचे कार्यालय किंवा तो ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता त्यावेळी का फोडले नाही? प्रशांत कोरटकरने चक्क बाॅयोलाॅजिकल बापापर्यंत पोहोचायची भाषा केली तेव्हा प्रशांत कोरटकरला (Prashant Koratkar) फोडायला हात का शिवशिवला नाही?,” असा संतप्त सवालही अंधारेंनी उपस्थित केला.
Sushma Andhare on Shinde faction
पुढे त्या म्हणाल्या की, “आता इतक्या खोट्या गोष्टी सहन केल्या आणि जर एखादा कलाकार अतिशय उपहासाने एखादी गोष्ट मांडत असेल, तर तुम्हाला एवढ्या मिरच्या का लागल्या?,” असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :