Uddhav Thackeray । स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Eknath Shinde) याच्या एका व्हिडीओमुळे राज्यात वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाल कामरा याने फक्त एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर एक गाणं नाहीतर त्याने शिंदेंना गद्दार म्हणत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ““कामराने काहीही चुकीचे म्हटले असे मला वाटत नाही. कारण त्याने सत्य असलेल्या जनभावना मांडल्या आहेत. मी कुणाल कामराच्या पाठीशी आहे,” असे ठाकरे म्हणाले.
“या गद्दारांना कोरटकर, सोलापुरकर दिसत नाही का? त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) सांगू इच्छितो की, न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे. त्या स्टुडिओला तोडफोडीची भरपाई द्यावे. फडणवीसांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “तुम्ही सुपारी सुपारी काय बोलता? नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराची कोणी सुपारी दिली? औरंगजेबाच्या कबरीची सुपारी कोणी दिली? जर राज्य आणि देश तुमच्या हातात असेल तर दंगल कशी होती?,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
Devendra Fadnavis on Kunal Kamra Controversy
दरम्यान, याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “अशाप्रकारे सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरा याला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :