Share

“… याला गुंड प्रवृत्ती म्हणतात,” ‘त्या’ गाण्यावरून Anjali Damania यांचा शिंदे गटावर निशाणा

by MHD
Anjali Damania Targets Shinde Group on Kunal Kamra Controversy

Anjali Damania । स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव न घेता टिपण्णी केली होती. त्यामुळे शिंदे गटासह शिवसैनिक चांगलेच भडकले आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

याप्रकरणी (Kunal Kamra Controversy) शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी तक्रार दिली होती. मुंबईतील एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिसांनी BNS च्या कलम 353(1)(b), 353(2) आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

परंतु, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

Anjali Damania post on X

अंजली दमानिया X वर लिहितात, “कुणाल कामरा जे म्हणाले ते जर अवडलं नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणं अपेक्षित आहे. पण स्वतः सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणं, तोडफोड करणं ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली,” असा घणाघात दमानिया यांनी केला.

“कामरावर सोडा आधी FIR हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला पाहिजे. त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही,” असे अंजली दमानिया यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या :

Shinde group activists vandalized the Habitat Comedy Club in Khar, Mumbai. Anjali Damania attacked the Shinde group over this.

Politics Maharashtra Marathi News