Share

भाईजानच्या Sikandar चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचाय? मग करा ‘हे’ छोटंसं काम

by MHD
Salman Khan Sikandar film Advance Booking

Sikandar । बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि साऊथची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांचा सिकंदर या चित्रपटाच्या रिलीजची सर्वांनाच उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. अशातच आता सिकंदर या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगबाबत (Sikander Movie Ticket Advance Booking) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित सिकंदरच्या ट्रेलरच्या रिलीजनंतर, मेकर्सने पोस्टमध्ये ‘सिकंदर’ च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तारीख कन्फर्म केली आहे.

या चित्रपटासाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग मंगळवार 25 मार्चपासून सुरू होईल. महत्त्वाचे म्हणजे सिकंदर या चित्रपट सलमान खानच्या टायगर 3 चे रेकॉर्ड मोडू शकतो. दरम्यान, या चित्रपटातील जोहरा जबीन या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

तसेच प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे 30 मार्चला गुढीपाडवा आहे. तर सोमवारी 31 मार्चला ईद आहे. त्यानंतर 1 एप्रिल आणि 2 एप्रिलला देखील सुट्टी आहे. 4 एप्रिलला वीकेंड असल्याने 6 एप्रिलपर्यंत हा चित्रपट जबरदस्त कमाई करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Sikandar Star Cast

सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त, सिकंदर चित्रपटात अभिनेत्री काजल अग्रवाल, अभिनेता सत्यराज, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास आणि निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

The trailer of the film Sikandar received a good response from the audience. Now, an important information has come to light regarding the advance booking of the film Sikandar.

Entertainment Marathi News