🕒 1 min read
IPL 2025 । आजपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आयपीएलचा (IPL) थरार रंगणार आहे. आजपासून चाहत्यांना अनेक रोमांचक सामने पाहायला मिळणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या सामन्यांमध्ये खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचं लक्ष असतं.
या वेळी काही संघांचे कर्णधार तर खेळाडूंची अदलाबदल झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यंदाच्या हंगामापासून काही नवीन नियम (IPL 2025 rule) आले आहेत. परंतु, आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने एक नवीन नियम (BCCI Rules) आणला आहे.
आता सुपर ओव्हरशी निगडित एक नवीन नियम समोर आला आहे. नवीन नियमानुसार आता बीबीसीआयने सुपर ओव्हर्सच्या संख्येत वाढ केली आहे. त्यामुळे आता चाहत्यांना अनलिमिटेड सूपर ओव्हरचा (Unlimited Super Over) सामना पाहायला मिळणार आहेत.
इतकेच नाही तर सुपर ओव्हर दरम्यान अयशस्वी डीआरएसची परवानगी देण्यात आली आहे. मुख्य सामना संपल्यानंतर एक तासापर्यंत विजेता निश्चित होईपर्यंत हवे तितक्या सुपर ओव्हर्स खेळवल्या जाणार आहेत.
पण पहिला सुपर ओव्हर मुख्य सामना संपल्यानंतर 10 मिनिटांच्या आत सुरू होणे गरजेचे आहे. जर पहिला सामना सुपर ओव्हर बरोबरीत सुटला तर पुढचा सुपर ओव्हर सामना पहिला ओव्हर संपल्यानंतर पाच मिनिटांनी सुरू करावा लागणार आहे.
IPL 2025 Super Over BCCI New Rule
समजा मॅच रेफरीला असे वाटले की 1 तासाचा कालावधी संपणार आहे, तर ते याची माहिती कर्णधारांना देतील. मुख्य सामन्यामध्ये सर्व खेळाडूंना दिलेला इशारा वेळ आणि अतिरिक्त वेळ सुपर ओव्हरमध्ये होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘त्या’ भेटीच्या चर्चांवर Chhagan Bhujbal भडकले, म्हणाले; “मग आम्ही मारामाऱ्या करायच्या का?”
- Ajit Pawar यांनी दिला नितेश राणेंना अप्रत्यक्षपणे इशारा, म्हणाले; “जर पुन्हा….”
- Vijay Wadettiwar यांची आमदारकी धोक्यात? महत्त्वाची माहिती आली समोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








