🕒 1 min read
Chhagan Bhujbal । राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून अनेक दिग्गज नेते, पदाधिकारी महाविकास आघाडीला रामराम ठोकत आहे. अशातच मागील काही दिवसांपासून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.
जरी जयंत पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला असला तरी आज त्यांनी उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. यामुळे ते शरद पवार गटाला रामराम ठोकणार की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यावर आता अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमची भेट रोजच होते. विधानसभेतही आम्ही भेटत असतो. मग आम्ही काही मारामाऱ्या करायच्या का? राजकारणात आम्ही विरोधी पक्षात आहोत, एकमेकांचे शत्रू नाही,” असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच त्यांनी औरंगजेबच्या कबरीवरून नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणी जो चुकला असेल त्याच्यावर कायद्यानुसार सक्तीची कारवाई करण्यात येईल,” असे भुजबळांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar first reaction on meeting with Jayant Patil
दरम्यान, अजित पवार यांनीही जयंत पाटील यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले. “वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीच्या निमित्ताने आमची भेट झाली. 10 ला मीटिंग होती. मध्ये 10-15 मिनिटांचा मध्ये वेळ होता. उगाचाच वेगळ्या बातम्या पसरवण्यात आल्या,” असे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar यांनी दिला नितेश राणेंना अप्रत्यक्षपणे इशारा, म्हणाले; “जर पुन्हा….”
- Vijay Wadettiwar यांची आमदारकी धोक्यात? महत्त्वाची माहिती आली समोर
- “मुख्यमंत्र्यांना औरंगजेबाची कबर काढायचीच नाही, त्यांनीच…”; Manoj Jarange Patil यांचा गंभीर आरोप









