Share

Ajit Pawar यांनी दिला नितेश राणेंना अप्रत्यक्षपणे इशारा, म्हणाले; “जर पुन्हा….”

Ajit Pawar has indirectly warned Nitesh Rane from the Iftar party.

by MHD

Published On: 

Ajit Pawar warning to Nitesh Rane

🕒 1 min read

Ajit Pawar । आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (NCP) दावते-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांना इफ्तार पार्टीतून अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.

“दोन धर्मांमध्ये आणि दोन गटांमध्ये भांडण लावून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करेन, त्याला सोडणार नाही. इथल्या शांततेला बाधा आणण्याचा जो प्रयत्न करेल, त्याच्यावर कायद्याचा बडगा उगारला जाईल,” असा इशारा अजित पवार यांनी दिले.

“तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. जर कुणी मुस्लीम बांधव आणि भगिनींना त्रास देण्याचा किंवा त्यांच्याकडे डोळे वटारून पाहण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला सोडणार नाही,” असेल अजित पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “मंत्री शपथ घेतल्यानंतर आपण एका समाजाचे मंत्री नसतो, तर राज्याच्या 13 कोटी लोकांचे मंत्री असतो. त्यामुळे मंत्री म्हणून बोलताना तारतम्य ठेवावे. आपल्या बोलण्याने वाद होईल आणि पोलिसांना काम लागेल, असे वर्तन कुणी करू नये,” असा सल्ला पवार यांनी दिला.

तसेच अजित पवारांनी दिशा सालियान प्रकरणाबद्दल (Disha Salian case) प्रतिक्रिया दिली. “त्या प्रकरणांमध्ये मी बातम्या वाचत आहे. एवढी मला माहिती नाही. कालपर्यंत मी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उत्तरात, पुरवणी मागण्यांमध्ये बिझी होतो,” असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar on Disha Salian case

“बातम्या देणाऱ्याने वस्तुस्थितीला धरुन बातमी द्यावी. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला वाटते, न्याय मिळाला नाही. त्यावेळी तो व्यक्ती संविधानानुसार न्यायालयात जाऊ शकतो,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Politics Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now
by MHD

🕘 संबंधित बातम्या