नवी मुंबई, 25 ऑक्टोबर: राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसाय करण्यास मनाई करावी, तसेच दिवाळीच्या सणात हिंदूंनी केवळ हिंदूंकडूनच वस्तूंची खरेदी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. राणेंच्या या आक्रमक विधानामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईतील जुईनगर येथे अन्नपुरवठा करणाऱ्या ‘हर हर’ या संस्थेच्या वतीने एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना राणे यांनी गैरहिंदूंवर जोरदार निशाणा साधला. हिंदू समाजाविरुद्ध कटकारस्थान रचणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ही मोठी सभा असल्याचे ते म्हणाले. तसेच, कुंभमेळ्यातील व्यवसाय आणि दिवाळीच्या खरेदीबाबत आपण केलेल्या या मागण्यांमध्ये गैर काय आहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दुसरीकडे, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून ३१ ऑक्टोबर रोजी या कुंभमेळ्याचे अधिकृत वेब पोर्टल सुरू केले जाणार आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून हे पोर्टल विकसित केले जात आहे. यात्रेकरूंसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या वेबसाईटवर अधिकृत घोषणा, स्नानाच्या तारखा व वेळा, प्रवासाची माहिती, आवश्यक सुविधा, तसेच सुरक्षेसंदर्भातील सर्व माहिती व सहाय्यक संसाधने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
कुंभमेळ्याच्या पोर्टलसोबतच ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभानिमित्त ध्वजारोहण सोहळाही पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांची भेट घेतली आणि हे निमंत्रण सुपूर्द केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- शेअर बाजाराच्या टिप्स देणारे व्हॉट्सॲप ग्रुप्स ठरताहेत धोक्याचे! SEBI चा गुंतवणूकदारांना गंभीर इशारा
- म्हाडाच्या ८१४ सदनिका आणि भूखंड हडप प्रकरण; २३ बिल्डरांची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू
- ‘लाडकी बहीण’नंतर आता एकल महिलांसाठी मोठी योजना; चंद्रकांत पाटलांची घोषणा, १२ लाख जणींना मिळणार आधार!
Quick Answers
आगामी नाशिक कुंभमेळ्यात गैरहिंदूंना व्यवसाय करण्यास मनाई करावी आणि दिवाळीच्या सणात हिंदूंनी केवळ हिंदूंकडूनच वस्तूंची खरेदी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
कुंभमेळ्याचे हे अधिकृत वेब पोर्टल ३१ ऑक्टोबर रोजी सुरू केले जाणार असून ते नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून विकसित केले जात आहे.
या वेबसाईटवर अधिकृत घोषणा, स्नानाच्या तारखा व वेळा, प्रवासाची माहिती, आवश्यक सुविधा, तसेच सुरक्षेसंदर्भातील सर्व माहिती आणि सहाय्यक संसाधने एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.
कुंभमेळ्याच्या प्रारंभानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








