Share

Vijay Wadettiwar यांची आमदारकी धोक्यात? महत्त्वाची माहिती आली समोर

Narayan Jambhule has filed an election petition in the High Court, objecting to the affidavit submitted by Vijay Wadettiwar along with the nomination paper.

by MHD

Published On: 

High Court summons to Vijay Wadettiwar

Vijay Wadettiwar । चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विजय वडेट्टीवार यांनी विजय मिळवला. पण आता त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

विजय वडेट्टीवार यांच्याकडून नामनिर्देशक पत्रासोबत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट नारायण जांभुळे (Narayan Jambhule) यांनी उच्च न्यायालयात (High Court) निवडणूक याचिका (Election Petition) दाखल केली आहे.

इतकेच नाही तर वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले तोच स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नी किरण वडेट्टीवार यांनी स्वतः च्या नावे खरेदी केला. स्टॅम्प कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध असल्याचा दावा जांभुळे यांनी केला आहे.

“एका व्यक्तीच्या नावाने खरेदी करण्यात आलेला स्टॅम्प पेपर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वापरता येत नसल्याने वडेट्टीवार यांचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरवावे आणि त्यांची नामनिर्देशन याचिका रद्द करावी”, अशी विनंती जांभुळे यांनी केली आहे.

HC summons to Vijay Wadettiwar over election fraud allegations

याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावला असून वडेट्टीवार यांना 25 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करावे लागणार आहे. त्यामुळे आता विजय वडेट्टीवार यांची आमदारकी धोक्यात आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर आता वडेट्टीवार काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही