Manoj Jarange Patil । आज अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून (Tomb of Aurangzeb) राज्य सरकारवर निशाणा साधला.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच औरंगजेबाची कबर फोकसला आणली. त्यांना कबर काढायचीच नाही. ते डबडं कुठं पुरून ठेवलं आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. जर त्यांना कबर काढायची असती तर त्यांनी पोलीस संरक्षण दिले नसते,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Aurangzeb Tomb Controversy)
“देवेंद्र फडणवीस तुम्ही चला, मीही येतो. कट्टर आहात ना? कबर कशी निघत नाही पाहू? सरकारनेच या कबरीच्या दिवा बत्ती, हारंफुलांसाठी तब्बल 2 लाख 60 हजार रुपयांचे बिल भरले आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“त्यांना मराठा समाजाची नस समजली असून आमच्या लेकरांनी मारामाऱ्या करायच्या आणि मलिदा यांनी खायचा. याच कारणामुळे मराठा समाजाचे वाटोळं झालं आहे. 70-75 वर्ष यांनी मराठ्यांचा भांडणासाठी वापर केला,” असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
Manoj Jarange Patil Reaction against Devendra Fadnavis
पुढे ते म्हणाले की, “या राजकारणामुळे मराठा समाजाची लेकरं खाक झाली आहे. आम्हाला शिक्षण दिलं नाही, नोकरी दिली नाही. आम्हाला खाक केलं आहे. समाजाच्या हाताखाली अडीअडचणी जाणून घेण्यासाठी एखादे पोरगं पाहिजे. यासाठी आम्ही बैठक घेतली आहे,” असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :