Share

कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या गाण्याचं Sanjay Raut यांनी केलं समर्थन, म्हणाले “देवेंद्रजी, तुम्ही कमजोर…”

by MHD
Sanjay Raut supports Kunal Kamra song

Sanjay Raut । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने एक व्यंगात्मक गाणे सादर केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिकांनी कामरा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिंदे गटाकडून या प्रकरणी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे. खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामराच्या गाण्याचे समर्थन केले आहे.

संजय राऊत यांनी कुणाल कामराचं गाणं रिपोस्ट करत ‘कुणाल की कमाल, जय महाराष्ट्र’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. इतकेच नाही तर दुसऱ्या एका पोस्टमधून त्यांनी शिंदे गटावर निशाणा देखील साधला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होऊ शकतो.

कामराच्या स्टुडिओचं शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नुकसान करताच संजय राऊत भडकले आहेत. “जर कुणालने महाराष्ट्राच्या राजकारणावर एक व्यंगात्मक गाणं लिहिलं, तर शिंदे गटाला मिरची लागली. त्यांच्या लोकांनी कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. देवेंद्रजी, तुम्ही कमजोर गृहमंत्री आहात,” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Kunal Kamra satirical song

दरम्यान, एकनाथ शिंदेंवर केलेल्या गाण्यावरून नवीन वादाला तोंड फुटल्यानंतर कुणाल कामरा हा राज्याबाहेर पसार झाला असल्याचा दावा करण्यात येत आहे. इतकेच नाही तर त्याचा फोनही बंद असल्याची माहिती आता समोर आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Sanjay Raut has supported Kunal Kamra song on Eknath Shinde. He has also targeted Devendra Fadnavis.

Politics Maharashtra Marathi News