Devendra Fadnavis । स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
यामुळे शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शिवसेनेच्या समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली.
यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुणाल कामराने आमच्यावर कविता करावी. राजकीय व्यंग करावे. आम्ही त्याला टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
“मुळात त्याला कॉन्ट्रोवर्सी तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याचा एक हव्यास असून यातूनच त्याने एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला,” असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Devendra Fadnavis on Kunal Kamra Controversy
पुढे ते म्हणाले की, “आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत. पण हे स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असल्यास ते मान्य होणार नाही. हा काय जनतेपेक्षा मोठा आहे का? जनतेने दाखवून दिलं आहे की बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा कोणाकडे आहे? तो वारसा एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला दिला,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :